Walmik Karad । वाल्मिक कराड याच्या अडचणी वाढल्या आहेत. काल एसआयटीकडून (SIT) वाल्मिक कराडवर संतोष देशमुख हत्या प्रकरणातही गुन्हा दाखल असल्याचे सांगत ताबा मागण्यात आला होता. त्यामुळे आज कोर्टात सुनावणीदरम्यान कराडला पोलीस कोठडी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जर असे झाले तर कराड आणि मंत्री धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) अडचणी वाढू शकतात, असे बोलले जात आहे.
पण आज कराडला केज सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार होतं. पण अचानक केजऐवजी त्याच्यावर बीड जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. याबाबत सीआयडीने केज न्यायालयात अर्ज केला असून तो अर्ज स्वीकारण्यात आला आहे.
तसेच कराडच्या सुनावणीपूर्वी केज आणि बीड जिल्हा न्यायलायबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. तसेच सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे. सुरक्षेचे कारण सांगत बीड जिल्हा न्यायालयात सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे. यासाठी सीआयडीकडून अर्ज केला होता.
Walmik Karad hearing shifts
महत्त्वाची बाब म्हणजे आज पुन्हा कराडच्या समर्थनार्थ व्यापाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी संत जगमित्र कार्यालयात कराड समर्थकांची बैठक बोलावली आहे. शिरसाळा आणि धर्मापुरी या गावात सकाळपासूनच सर्व व्यवहार ठप्प केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :