Share

विलास घुले हत्या प्रकरणात मोठी अपडेट! SIT च्या हाती लागले मोठे पुरावे

विलास घुले हत्या प्रकरणात SIT ने आरोपींची स्कॉर्पिओ गाडी आणि हल्ल्यासाठी वापरलेला चाकू जप्त केल्याने तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे.

Published On: 

🕒 1 min read

बीड : जिल्ह्यातील केज येथे झालेल्या विलास घुले हत्या प्रकरणात (Vilas Ghule Murder Case) तपासाला मोठी गती मिळाली आहे. दोन गटांमधील वाद मिटवण्यासाठी गेलेल्या हॉटेल व्यावसायिक विलास घुले (Vilas Ghule) यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. या घटनेनंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) नियुक्त करण्यात आले असून, आता तपास यंत्रणेच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले आहेत.

आरोपींची स्कॉर्पिओ आणि चाकू जप्त

विलास घुले हत्या प्रकरणात आरोपींनी वापरलेली पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी SIT ने जप्त केली आहे. घटनास्थळी आरोपी याच वाहनातून आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. याशिवाय हल्ल्यासाठी वापरण्यात आलेला चाकू देखील आरोपीच्या शेतातून जप्त करण्यात आला आहे. या पुराव्यामुळे प्रकरणाच्या तपासाला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

सैरव सोनवणे यांचीही चौकशी

या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सैरव सोनवणे यांच्यावरही आरोप करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर SIT कडून त्यांची चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान, तपास यंत्रणा या प्रकरणातील सर्व बाजूंचा तपास करत असून, पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नेमकं काय घडलं होतं?

विलास घुले हे हॉटेल व्यावसायिक होते. दोन गटांमध्ये सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी ते गेले होते. मात्र याच वेळी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बीड जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही