Walmik Karad । काल वाल्मिक कराडला मोक्का (Mokka) लागताच त्याच्या समर्थनार्थ त्याचे समर्थक रस्त्यावर उतरले होते. त्यांनी मोक्का लावल्यानंतर अवघ्या 10 मिनिटांतच परळी बंद केली होती. यामुळे परळीमध्ये काल तणावाचे वातावरण होते.
अशातच आता आज पुन्हा कराडच्या समर्थनार्थ व्यापाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी संत जगमित्र कार्यालयात कराड समर्थकांची बैठक बोलावली आहे. शिरसाळा आणि धर्मापुरी या गावात सकाळपासूनच सर्व व्यवहार ठप्प केले आहेत.
संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणी वाल्मिक कराडला विनाकारण टार्गेट केले जात असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. त्यामुळे या व्यापाऱ्यांनी बंद (Parali Traders Strike) पुकारला आहे. यावर आता प्रशासन कोणते पाऊल उचलते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Parali Traders Indefinite Strike
गुन्हेगाराला वाचवण्यासाठी सामान्य लोकांना वेठीस धरण्याचे काम समाजकंटक करत आहेत. समाजात जर अशी समाजकंटक वावरत असतील तर उद्याच्या भविष्याचे काय होईल? एखाद्या गुन्हेगारासाठी समाजकंटक रस्त्यावर येऊन परळी बंद पाडत असतील तर नक्कीच कराडच्या मागे मोठा हात असू शकतो? असा सवाल जनतेच्या मनात पडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :