Walmik Karad । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येनंतर 14 दिवसांपासून कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. हा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण कराड हा त्यांच्या जवळचा व्यक्ती आहे.
जर चौकशीदरम्यान त्याने धनंजय मुंडे यांचे नाव घेतले तर त्यांच्या अडचणी वाढू शकतात. कराडवर मोक्का (Mokka) कायद्यांतर्गत कारवाई केल्यानंतर त्याची रवानगी बीडच्या सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली आहे. पण आज पुन्हा एकदा त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे.
काल एसआयटीकडून वाल्मिक कराडवर संतोष देशमुख हत्या प्रकरणातही गुन्हा दाखल असल्याचे सांगत ताबा मागण्यात आला होता. त्यामुळे आता आज कराडला पोलीस कोठडी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जर असे झाले तर कराड आणि धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढू शकतात, असे बोलले जात आहे.
Action taken against Walmik Karad
दरम्यान, संतोष देशमुख हत्याप्रकरणात काल कराडवर मोक्का लावला. पण त्यानंतर याचे पडसाद परळीमध्ये उमटल्याचे पाहायला मिळाले. काही समाजकंटकांनी काल परळी बंद केल्यानंतर आज परळीत पोलिसांचा बंदोबस्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :