Share

‘आका’चा खेळ खल्लास? वाल्मिक कराडला मोक्का लावताच Suresh Dhas म्हणाले…

by MHD
Suresh Dhas has criticized Walmik Karad

Suresh Dhas । सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराड (Walmik Karad) वर टीकेची झोड उठवली आहे. दररोज ते कराडवर गंभीर आरोप करत धक्कादायक खुलासे करत होते. आज वाल्मिक कराड याला मोक्का (Mokka to Walmik Karad) लावताच त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“या गुन्ह्यात वाल्मिक कराड हा आरोपी आहे की आणखी कोण आहे? हा मुद्दा नाहीच. तर मुद्दा संतोष देशमुख यांच्या हत्येचा होता. यातील कोणताही दोषी सुटणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. आज कोर्टात काय झाले, याची माहिती नाही. पण देशमुख प्रकरणात कोणताही दोषी सुटणार नाही,” असा दावा सुरेश धस यांनी व्यक्त केला आहे.

वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या जवळचा व्यक्ती मानला जातो. सोशल मीडियावर देखील त्या दोघांचे फोटो आहेत. यावरून विरोधक सतत निशाणा साधत असतात. दरम्यान, जर या प्रकरणात वाल्मिक कराड याने धनंजय मुंडे यांचे नाव घेतले तर त्यांच्या वाढू शकतात.

Suresh Dhas on Walmik Karad

माहितीनुसार, यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जर या प्रकरणात मुंडेंचे नाव आले तर त्यांना त्यांचा राजीनामा घ्यावा लागेल असा इशारा दिला आहे. त्यामुळे आता वाल्मिक कराड तपासादरम्यान कोणता खुलासा करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

BJP MLA Suresh Dhas has criticized Walmik Karad in Sarpanch Santosh Deshmukh murder case. Suresh Dhas has reacted as soon as Karad was targeted.

Maharashtra Marathi News

Join WhatsApp

Join Now