Walmik Karad । आज सुनावणीदरम्यान न्यायालयाकडून खंडणीच्या आरोपात अटकेत असणाऱ्या वाल्मिक कराडवर मोक्का लावला आहे. तसेच त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याचा ताबा एसआयटी घेऊ शकते. हा कराडसाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे तपासाला आणखी गती मिळू शकते. (Mokka to Walmik Karad)
एकीकडे वाल्मिक कराडवर मोक्का लागला आहे. तर दुसरीकडे वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ त्याचे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. मोक्का लावल्यानंतर अवघ्या 10 मिनिटांतच परळी बंद केली आहे. दवाखाने आणि मेडिकल सोडून सर्व दुकानं देखील बंद केली आहेत. कराड समर्थकांनी परळी पोलीस ठाण्याच्या बाहेर ठाण मांडले आहे.
गुन्हेगाराला वाचवण्यासाठी सामान्य लोकांना वेठीस धरण्याचे काम समाजकंटक करत आहेत. समाजात जर अशी समाजकंटक वावरत असतील तर उद्याच्या भविष्याचे काय होईल? एखाद्या गुन्हेगारासाठी समाजकंटक रस्त्यावर येऊन परळी बंद पाडत असतील तर नक्कीच कराडच्या मागे मोठा हात असू शकतो? असा सवाल जनतेला पडला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे वाल्मिक कराडला अटक होऊन न्यायालयाला देखील कारवाई करण्यास 15 दिवसांचा कालावधी लागला.
Shutdown in Parli
जर सर्वसामान्यांना न्याय देण्यास न्यायालयाला देखील इतका वेळ लागत आहे, तर त्यांनी न्याय कुणाकडे मागायचा असा सवाल सर्वसामान्य जनतेच्या मनात पडला आहे. वाल्मिक कराड समर्थकांनी परळी बंद पाडल्यानंतर परळीत आणखी काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :