Walmik Karad । आज वाल्मिक कराडला सत्र न्यायालयात हजर करण्यापूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी केली. एरवी थाटात वावरणाऱ्या वाल्मिक कराडची अवस्था 13 दिवसात दयनीय झाली आहे. आज त्याला सुनावणीसाठी कोर्टात हजर करताना त्याचा लूक व्हायरल झाला आहे.
व्हायरल फोटोमध्ये वाढलेली दाढी आणि डोक्याचे केस विस्कटले असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, बीड जिल्ह्याचे वातावरण कालपासून तापत चालले आहे. कालच संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले होते. आज वाल्मिक कराड यांच्या समर्थकांचे आंदोलन सुरु आहे.
तसेच वाल्मिक कराडच्या आईने पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरू केले आहे. “आवादा कंपनीच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेले वाल्मिक कराड यांच्यावर अन्याय होत आहे. माझा मुलगा देवमाणूस आहे. माझ्या मुलाला न्याय द्या, अशी मागणी पारुबाई कराड (Parubai Karad) यांनी परळी पोलीस ठाण्यासमोर केली आहे.
Walmik Karad Viral Look
आज कराडला केज सत्र न्यायालयात हजर केले आहे. या सुनावणीदरम्यान न्यायालयाकडून त्याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई केली जाईल का? याकडे देशमुख कुटुंबियांसह सर्वांचे लक्ष लागले आहे. जर त्याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई केली तर या तपासाला आणखी वेग येईल.
महत्त्वाच्या बातम्या :