Walmik Karad । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरण तापत चालले आहे. खंडणीप्रकरणात अटक केलेल्या वाल्मिक कराडच्या सुटकेसाठी आता त्याचे समर्थक एकवटले आले आहेत. शहरातल्या लक्ष्मीबाई टॉवरवर चढून समर्थकांकडून घोषणाबाजी करण्यात येत आहे.
कालच संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले होते. अशातच आज वाल्मिक कराड यांच्या समर्थकांचे आंदोलन सुरु आहे. यामुळे प्रशासनावर दबाव आला आहे. तसेच या आंदोलनादरम्यान एका समर्थकाला भोवळ आल्याची माहिती समोर आली आहे.
Walmik Karad activist andolan
इतकेच नाही तर वाल्मिक कराडच्या आईने पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरू केले आहे. “आवादा कंपनीच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेले वाल्मिक कराड यांच्यावर अन्याय होत आहे. माझा मुलगा देवमाणूस आहे. माझ्या मुलाला न्याय द्या, अशी मागणी पारुबाई कराड (Parubai Karad) यांनी परळी पोलीस ठाण्यासमोर केली आहे.
दरम्यान, आता वाल्मिक कराड याच्या समर्थकांच्या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढला आहे. आता प्रशासन कशाप्रकारे हे प्रकरण हाताळतंय हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तसेच आज कराडला केज सत्र न्यायालयात हजर केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :