Share

Walmik Karad च्या आईचे पोलीस ठाण्यासमोर आंदोलन, मोठी मागणी करत म्हणाल्या; “मुलगा देवमाणूस….”

New revelations are coming out every day in the Sarpanch Santosh Deshmukh murder case. Similarly, the mother of Walmik Karad, who is accused in the crime of extortion, has started a sit-in in front of the police station.

by MHD

Published On: 

Walmik Karad mother big demand

Walmik Karad । सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहे. अशातच या प्रकरणी काल संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी (Dhananjay Deshmukh) वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, या मागणीसाठी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले.

अशातच खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडच्या आईने पोलीस ठाण्यासमोर ठिय्या सुरू केला आहे. “आवादा कंपनीच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेले वाल्मिक कराड यांच्यावर अन्याय होत आहे. माझा मुलगा देवमाणूस आहे. माझ्या मुलाला न्याय द्या, अशी मागणी पारुबाई बाबुराव कराड (Parubai Baburao Karad) यांनी परळी पोलीस ठाण्यासमोर केली आहे.

Walmik Karad case

तसेच 25 जानेवारीपासून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासह सामूहिक आमरण उपोषण करणार आहेत. अशातच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून राज्याचे वातावरण तापले आहे. यावरून आता कोणतीही घटना किंवा तणाव निर्माण होऊ नये म्हणून आजपासून ते 25 जानेवारीपर्यंत जमावबंदी आदेश लागु केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही