Walmik Karad । 9 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोग संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. याप्रकरणातील वाल्मिक कराड याला सोडून सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. पण वाल्मिक कराडवर मोक्का न लावल्याने पुन्हा एकदा राज्याचे वातावरण तापले आहे.
खंडणी प्रकरणात अटकेत असणाऱ्या वाल्मिक कराडची आज सीआयडी कोठडीची मुदत संपत आहे. आज त्याला मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. त्यामुळे सुनावणीदरम्यान आज त्याला मोक्का (Mokka) लावणार का? याकडे देशमुख कुटुंबियांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Walmik Karad will be mokka?
दरम्यान, याप्रकरणी सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे आणि महेश केदार या सात जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपासावेळी सिद्धार्थ सोनवणे याचाही गुन्ह्यातील सहभाग असल्याचं समोर आल्याने त्यालाही अटक केली आहे. पण अजूनही या घटनेतील कृष्णा आंधळे फरार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :