🕒 1 min read
Manoj Jarange । राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. एकीकडे संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत, तर दुसरीकडे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) हे आमनेसामने आले आहेत.
अशातच आज मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांकडून धमकी देण्यात आली आहे, असा आरोप हाकेंनी केला आहे. इतकेच नाही तर धमकीचा व्हिडीओ देखील लक्ष्मण हाके यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये लक्ष्मण हाके फोनवर बोलत असून समोरील माणूस त्यांना धमकी देत असल्याचे दिसत आहे.
Manoj Jarange Patil VS Laxman Hake
यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “जाय तिकडे, भिकार साले,” अशी संतप्त प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिली आहे. यावरून पुन्हा एकदा जरांगे विरुद्ध हाके असा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावर आता लक्ष्मण हाके काय प्रतिक्रिया देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या :
- Santosh Deshmukh हत्याप्रकरणी Eknath Shinde यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले; “आरोपींना फाशी सारखी शिक्षा…”
- “मला ड्रग्ज देऊन त्याने माझ्यावर…”; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यावर Kangana Ranaut चा गंभीर आरोप
- ‘या’ 65 इंचाच्या Smart TV वर मिळतेय चक्क 63 हजारांची सवलत, कुठे मिळतोय लाभ? जाणून घ्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now