Share

Santosh Deshmukh हत्याप्रकरणी Eknath Shinde यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले; “आरोपींना फाशी सारखी शिक्षा…”

Reactions are coming from the political circles on the Santosh Deshmukh murder case. Deputy Chief Minister Eknath Shinde has given a big reaction to this.

by MHD

Published On: 

Eknath Shinde on Santosh Deshmukh case

🕒 1 min read

Eknath Shinde । सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणावरून बीड जिल्हा चर्चेच्या प्रकाशझोतात आला आहे. वाल्मिक कराडवर मोक्काअंतर्गत कारवाई का झाली नाही? असा सवाल उपस्थित करत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी आज पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. तब्बल चार तासानंतर त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

अशातच आता संतोष देशमुख हत्याप्रकरणावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. “संतोष देशमुख प्रकरण अतिशय दुर्दैवी आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. अतिशय निर्घृणपणे हत्या झाली आहे. शासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः सीआयडी, एसआयटी लावलेली आहे. यातील एकही आरोपी सुटणार नाही,” असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

Eknath Shinde on Santosh Deshmukh case

पुढे ते म्हणाले की, “कोणाशीही लागेबांधे असले तरी सरकार कुणाला पाठीशी घालणार नाही. आरोपींना फाशी सारखी शिक्षा द्यावी, अशी विनंती न्यायालयाकडे करण्यात येणार आहे. फास्टट्रॅकवर हा खटला चालवला जाईल. एखाद्या सरपंचाची निर्घृण हत्या होते हे अत्यंत दुर्दैवी आहे. या तपासात कोणीही सुटणार नाही,” अशी माहिती शिंदे यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
by MHD

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)