Manoj Jarange । बीड तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. पवनचक्की प्रकरणातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या हत्येला महिना लोटला तरीही एक आरोपी फरार असून वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आला नाही.
वाल्मिक कराडवर मोक्का लावून कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी आज बीडमधील नागरिक रस्त्यावर उतरले. तर, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. यावेळी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी आंदोलनाला भेट दिली. यानंतर माध्यमांशी बोलताना मनोज जरांगेंनी धनंजय मुंडे यांना थेट इशारा दिला आहे.
Manoj Jarange on Santosh Deshmukh Murder Case
“देशमुख कुटुंबातील एकाही व्यक्तीच्या जीवाला काहीही झालं आणि संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन”, असा इशारा मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी दिला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर देखील हल्लाबोल केलाय.
जरांगे म्हणाले, ” जर देशमुख कुटुंब तुम्हाला पाहून हताश होणार असेल तर तुम्ही अयशस्वी झाला आहात. तुम्हाला पाहून या कुटुंबीयांना धीर यायला हवा होता तो आला नाही. त्यांच्या लेकीनं, धनंजयनं छाती ठोकून आम्हाला न्याय मिळेल असं सांगायला हवं होतं. हे काम सरकार म्हणून मुख्यमंत्र्यांनी करणे अपेक्षित असतं. आरोपीलाच तुम्ही सांभाळायला लागलात.”
महत्वाच्या बातम्या :