Santosh Deshmukh । वाल्मिक कराडवर अद्याप मोक्काअंतर्गत कारवाई का झाली नाही?, असा सवाल उपस्थित करत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी पोलीस तपासावर नाराजी व्यक्त केली आहे. मस्साजोगमध्ये धनंजय देशमुख यांनी आज पाण्याच्या टाकीवर आंदोलन केले.
Vaibhavi Deshmukh On Santosh Deshmukh Murder Case
दरम्यान, संतोष देशमुख ( Santosh Deshmukh ) यांची कन्या वैभवी देशमुख हिने सरकारला सवाल केला आहे. “माझ्या पप्पांना वडिलांना तर रस्त्यावरून उचलून नेलं. आता काकाला काही झालं तर याला जबाबदार कोण? प्रशासन नक्की करतंय काय?”, असे संतप्त सवाल वैभवी देशमुखने केले आहेत.
आज काका टाकीवर चढलाय, आरोपींना अटक झाली नाही तर आमचं संपूर्ण कुटुंब टाकीवर जाईल, असा इशारा वैभवीने दिला आहे. दरम्यान, यावर धनंजय देशमुख यांनीही आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळाला. “मनोज दादांवरही केस टाकली जात आहे. न्याय मागताना केस दाखल केल्या जात असतील तर मी न्याय कशासाठी मागू?”, असा सवाल धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :