🕒 1 min read
Devendra Fadnavis । सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणी आरोपी वाल्मिक कराड याला सोडून सर्व आरोपींवर मोक्का कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. यावरून धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) आक्रमक झाले आहेत. त्यांनी उंच टाकीवर चढून आंदोलन सुरु केले. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीदेखील आंदोलनस्थळी धाव घेतली.
यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी एक्सवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात याला कारण समस्त “आकां”चे सरताज देवेंद्र फडणवीस जी हे गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत. सध्या मस्साजोगमध्ये जे चाललंय ते पाहता संतोष देशमुखांची हत्या भाजप इष्टापत्ती म्हणून बघत आहे का? फडणवीस साहेब हा जीवघेणा खेळ थांबवा,” असे आवाहन सुषमा अंधारे यांनी केले आहे.
Sushma Andhare on Devendra Fadnavis
दरम्यान, आता सुषमा अंधारे यांच्या विधानावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यावर आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) काय प्रत्युत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अखेर 4 तासांनंतर धनंजय देशमुख यांनी आंदोलन मागे घेतले.
महत्त्वाच्या बातम्या :
- Los Angeles Fire : लॉस एंजेलिसमध्ये आगीचा तांडव, 24 जणांचा मृत्यू तर 150 अब्जाचा नुकसान
- ओबीसी नेते Laxman Hake यांना जीवे मारण्याची धमकी; व्हिडीओ शेअर करत म्हणाले…
- मोठी बातमी! Santosh Deshmukh यांचे बंधू धनंजय देशमुख अचानक गायब, फोनही बंद; घरात रडारड आणि..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










