Los Angeles Fire : कॅलिफोर्नियाच्या (California) जंगलातून पसरलेल्या आगीने लॉस एंजेलिसमध्ये (Los Angeles Fire) मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. या आगीत आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण आताही बेपत्ता आहे. तर दुसरीकडे या आगीमुळे 12 हजारांहून अधिक इमारती नष्ट झाल्या आहेत, ज्यामध्ये घरे, अपार्टमेंट, व्यावसायिक इमारती इत्यादींचा समावेश आहे.
अग्निशमन दल (Fire Brigade) आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र आतापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आगीमुळे लाखो लोकांना घरे सोडावी लागत आहेत. या आगीने हॉलिवूड हिल्सनाही (Hollywood Hills) वेढले आहे. अनेक सेलिब्रिटींची घरे आगीत जळून खाक झाली आहेत.
135-150 अब्ज डॉलर्सचे नुकसान
आगीचे कारण अद्याप समजलेले नाही मात्र ही अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी आग असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. माहितीनुसार, रविवारी कॅलिफोर्नियातील सुमारे 70,000 लोक वीजेशिवाय राहत आहे. तर अमेरिकेच्या हवामान विभागानुसार रविवारी दिवसा वारे कमकुवत झाले परंतु रात्री पुन्हा वेग वाढल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आलेला नाही. माहितीनुसार, सरकारी अधिकाऱ्यांनी अद्याप नुकसानीचा अंदाज घेतलेला नाही. तथापि, आगीमुळे झालेले नुकसान सुमारे $135 अब्ज ते $150 अब्ज असण्याचा अंदाज आहे.
भीषण आगीमुळे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांचा परदेश दौरा रद्द केला. त्याच वेळी, नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरवर संतापलेले दिसले.
हजारो लोकांना स्थलांतरित करण्यात आले (Thousands of people were displaced)
आगीमुळे पॅसिफिक पॅलिसेड्स आणि अल्टाडेनासह अनेक दाट लोकवस्ती असलेल्या भागांना धोका निर्माण झाला आहे आणि ते नष्ट झाले आहेत. सुमारे 1,50,000 लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे तर 700 हून अधिक लोकांनी नऊ सुविधांमध्ये आश्रय घेतला आहे. रविवारपर्यंत, कॅल फायरने पॅलिसेड्स आग 11 टक्के आणि ईटन आग 27 टक्के आटोक्यात आणल्याचा अहवाल दिला.
महत्वाच्या बातम्या :