IPL 2025 : क्रिकेट चाहत्यांसाठी बीसीसीआयने (BCCI) मोठी घोषणा करत आयपीएल 2025 साठी तारखा जाहीर केल्या आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार आयपीएल 2025 (IPL 2025) ची सुरुवात 21 मार्च पासून सुरु होणार आहे. तर या स्पर्धेचा अंतिम सामना 25 मे रोजी होणार आहे. यावेळी देखील या स्पर्धेत 74 सामने खेळले जाणार असल्याची माहिती राजीव शुक्ला (Rajeev Shukla) यांनी दिली आहे.
तर दुसरीकडे बीसीसीआय आयपीएल 2025 मध्ये पहिल्यांदा आयसीसीची (ICC) आचारसंहिता लागू करणार आहे. 12 जानेवारी रोजी झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत आयपीएल 2025 मध्ये बीसीसीआयने आयसीसीच्या आचारसंहितेचे पालन करण्याचा निर्णय घेण्यात आला. नाव न सांगण्याच्या अटीवर एका गव्हर्निंग कौन्सिल सदस्याने सांगितले की, आतापासून आयपीएलमध्ये लेव्हल 1,2 आणि 3 च्या उल्लंघनांसाठी आयसीसीने मंजूर केलेला दंड आकारला जाणार आहे. यापूर्वी आयपीएलची स्वतःची आचारसंहिता होती पण आता ती आयसीसी टी-20 आंतरराष्ट्रीय खेळण्याच्या परिस्थितीनुसार नियंत्रित केली जाणार आहे. याच बरोबर आता वूमन प्रीमियर लीग चार शहरांमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
माहितीनुसार, WPL सामने लखनौ, मुंबई, बडोदा आणि बेंगळुरू येथे होणार आहे. 2025 डब्ल्यूपीएल 7 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान होण्याची अपेक्षा आहे.
Appointment of a new secretary
12 जानेवारी रोजी झालेल्या बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत (SGM) बीसीसीआयने नवीन सचिवाची नियुक्ती केली आहे. या बैठकीत देवजीत सैकिया (Devjit Sakia) आणि प्रभतेज सिंग भाटिया (Prabhtej Singh Bhatia) यांची सचिव आणि कोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जय शहा (Jai Shah) आणि आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राजीनामा दिल्यानंतर ही दोन्ही पदे रिक्त होती. या रिक्त पदांसाठी अर्ज दाखल करणारे सैकिया आणि भाटिया हे एकमेव उमेदवार असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
गेल्या महिन्यात आयसीसीचे अध्यक्ष झाल्यानंतर शाह यांना सचिवपद सोडावे लागले होते तर शेलार यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर बीसीसीआयच्या खजिनदारपदाचा राजीनामा दिला होता. 1 डिसेंबर रोजी जय शाह आयसीसीचे अध्यक्ष झाल्यानंतर साकिया यांची जय शाह यांच्या जागेवर जबाबदारी पार पाडत होते.
महत्वाच्या बातम्या :
- Maruti Suzuki Car Discount Offers : मारुती करणार ग्राहकांचा फायदा, ‘या’ कारवर देत आहे तब्बल 1.33 लाखांची सूट
- Mercedes Electric G Class Launched : दमदार फीचर्स अन् 473 किमी रेंजसह बाजारात आली मर्सिडीज इलेक्ट्रिक जी क्लास, किंमत फक्त…
- “अपघात की घातपात?”; अभिमन्यू क्षीरसागर अपघातप्रकरणी Suresh Dhas यांचा सवाल