Maruti Suzuki Car Discount Offers : जर तुम्ही देखील नवीन वर्षाच्या सुरुवातील नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी देशाची सर्वात मोठी ऑटो कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) एक भन्नाट ऑफर आणली आहे. या ऑफरचा फायदा घेत तुम्ही नवीन कार खरेदीवर तब्बल 1.33 लाखांची बचत करून नवीन कार घरी आणू शकतात. होय, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भारतीय बाजारात मारुती सुझुकी फ्रॉन्क्सच्या (Maruti Suzuki Fronx) विविध व्हेरियंटवर डिस्काउंट ऑफर (Discount Offer) देत आहे. ज्याच्या फायदा घेत तुम्ही भन्नाट फीचर्स, उत्तम मायलेजसह येणारी कार खरेदी करू शकतात.
समोर आलेल्या माहितीनुसार, कंपनी नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मारुती फ्रॉन्क्सच्या टर्बो-पेट्रोल व्हेरियंटवर 83000 पर्यंतची सूट देत आहे. ज्यामध्ये व्हेलॉसिटी किट अॅक्सेसरी पॅकेजचा समावेश आहे. तर क्रॉसओवरच्या नियमित पेट्रोल व्हेरियंटवर ग्राहकांना 25000 पर्यंत फायदे मिळत आहेत. तर सीएनजी व्हेरियंटवर 10000 चा एक्सचेंज बोनस आणि 15000 चा स्क्रॅपेज बेनिफिट कंपनीकडून देण्यात येत आहे. हे ऑफर 2025 मध्ये उत्पादित फ्रॉन्क्स युनिट्सवर लागू आहेत.
तर 2024 मध्ये उत्पादित फ्रॉन्क्स स्टॉकवर पेट्रोलवर 45000 रुपयांपर्यंत आणि टर्बो पेट्रोल (वेलोसिटी किटसह) व्हेरियंटवर 1.33 लाख रुपयांपर्यंत सूट देण्यात येत असल्याची माहिती डीलर्सने दिली आहे. याचबरोबर फ्रॉन्क्स सीएनजी मॉडेलवर देखील ग्राहकांना 25 हजारांची सूट देण्यात येत आहे.
भारतीय बाजारात सध्या मारुती सुझुकी फ्रॉन्क्स सिग्मा, डेल्टा, डेल्टा प्लस, झेटा आणि अल्फा या पाच व्हेरियंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. या कारमध्ये कंपनीने दोन इंजिन पर्याय दिले आहे. एक 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 100 बीएचपीची कमाल शक्ती आणि 148 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तर दुसऱ्यामध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन जास्तीत जास्त 90 बीएचपी पॉवर आणि 113 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करू शकते. तसेच फ्रॉन्क्समध्ये सीएनजी पर्याय देखील उपलब्ध आहे. जो जास्तीत जास्त 77.5 बीएचपी पॉवर आणि 98 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. फ्रॉन्क्स सीएनजी 28.51 किमी पर्यंत मायलेज देऊ शकते.
Maruti Suzuki Fronx Features
कारच्या केबिनमध्ये नऊ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, क्रूझ कंट्रोल, वायरलेस फोन चार्जिंग सारखी फीचर्स देण्यात आली आहेत. तर सेफ्टीसाठी या कारमध्ये सहा एअरबॅग्ज, 360-डिग्री कॅमेरा यांसारखी फीचर्स उपलब्ध आहे.
बाजारात ही कार किआ सोनेट, ह्युंदाई व्हेन्यू, टाटा नेक्सॉन, महिंद्रा एक्सयूव्ही 300 सारख्या एसयूव्ही कार्सशी स्पर्धा करते. तसेच या कारची किंमत भारतीय बाजारात 7.51 लाख ते 13.04 लाखांपर्यंत जाते .
महत्वाच्या बातम्या :