Santosh Deshmukh | संतोष देशमुख यांच्या हत्या (Santosh Deshmukh murder) प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी राज्यभरातून मोर्चे काढले जात आहेत. यामध्ये देशमुख यांचे कुटुंबीय देखील उपस्थित राहत आहेत. काल जालन्यामध्ये देखील हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. (Santosh Deshmukh murder case)
हत्येच्या गुन्ह्यामध्ये मोठी कारवाई करत एसआयटीने (SIT) आरोपींवर मोक्का लावला आहे. एसआयटीच्या या निर्णयामुळे आरोपींना जामीन मिळणे अवघड झाले आहे. पण सध्या वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली असल्याने त्याच्यावर मोक्का लावण्यात आला नाही.
Dhananjay Deshmukh Reaction On Santosh Deshmukh Muder Case Investigation
यावर आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख ( Dhananjay Deshmukh ) यांनी संताप व्यक्त केला आहे. धनंजय देशमुख यांनी टॉवरवर चढून स्वतःला संपवून घेण्याचा इशारा दिला आहे. तपास यंत्रणा आम्हाला तपासाबाबत कोणतीही माहिती देत नसून काही आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का?, असा सवालही त्यांनी केलाय.
धनंजय देशमुख म्हणाले, “आरोपीला मोक्का अंतर्गत आणि ३०२ च्या गुन्ह्यात जर घेतलं नाही तर उद्या १० वाजल्यापासून माझं आणि माझ्या कुटुंबाचं वैयक्तिक आंदोलन मोबाईल टॉवर करणार आहोत. त्या टॉवरवर जाऊन मी स्वत:ला संपवून घेतो. कारण आज जर आरोपी जर सोडले तर उद्या हे माझाही खून करतील. मग माझ्या कुटुंबासाठी कोण न्याय मागणार? या भीतीपोटी मी हा निर्णय घेत आहे.”
महत्वाच्या बातम्या :