Share

बीड पुन्हा हादरलं; Santosh Deshmukh नंतर परळीत आणखी एका सरंपचाचा मृत्यू 

Santosh Deshmukh | राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परनं सौंदना गावचे विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर ( Abhimanyu Kshirsagar ) यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत क्षीरसागर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Published On: 

बीड पुन्हा हादरलं; Santosh Deshmukh नंतर परळीत आणखी एका सरंपचाचा मृत्यू 

Santosh Deshmukh | बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी संपूर्ण राज्यात मोर्चे काढले जात आहेत. या प्रकरणाने राज्याचे राजकारण ढवळून निघाले असताना आता पुन्हा एकदा बीडमधील परळी तालुक्यातील आणखी एका सरपंचाचा अपघाती मृत्यू झाला आहे.

Abhimanyu Kshirsagar Accident In Parli

परळीतील औष्णिक विद्युत प्रकल्पातून निघणाऱ्या राखेची अवैध वाहतूक आणि व्यवसाय होत असल्याचा आरोप भाजपाचे आमदार सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनी केला होता. याच राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परनं सौंदना गावचे विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर ( Abhimanyu Kshirsagar ) यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत क्षीरसागर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

परळी तालुक्यातील मिरवट फाट्यावर हा अपघात झाला. या अपघातात क्षीरसागर यांच्या दुचाकीचा चुराडा झाला आहे. संतोष देशमुख ( Santosh Deshmukh ) हत्याप्रकरण ताजे असतानाच आता हा अपघात झाल्याने याबाबत अनेक शंका उपस्थित होत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही