Dhananjay Munde । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक केली आहे. हाच वाल्मिक कराड अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे, असे बोलले जात आहे. त्याच्यासोबतचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.
बीड प्रकरणात दिल्ली हाय अलर्ट मोडवर आली आहे. याप्रकरणी दिल्लीतील भाजप नेते यावर बारीक लक्ष ठेवून आहेत. माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील याच मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली होती. जर तपासात मुंडे यांची दोषारोपण करणारी ठोस पुरावे सापडले तर त्यांना राजीनामा द्यावा लागेल, अशी माहिती भाजपच्याच एका वरिष्ठ नेत्याने केली होती.
Dhananjay Munde resignation demand
तसेच विरोधकांसह भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनीदेखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करत त्यांचा राजीनामा मागितला आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांचे पद जाणार की वाचणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.
महत्त्वाच्या बातम्या :