Sanjay Raut | संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत आरोपींवर हत्येच्या गुन्ह्यामध्ये एसआयटीने (SIT) मोक्का लावला आहे. एसआयटीच्या या निर्णयामुळे आरोपींना जामीन मिळणे अवघड झाले आहे. पण सध्या वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली असल्याने त्याच्यावर मोक्का लावण्यात आला नाही.
या प्रकरणाला महिना उलटून गेला तरी या गुन्ह्यातील सर्व आरोपी पकडले गेले नाहीत. त्यामुळे या तपासाबाबत विरोधकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांना सवाल केला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे वारंवार सांगत आहेत की कोणालाही सोडणार नाही. पण मुख्य आरोपीला त्यांनी सोडले आणि इतर आरोपींना मोका लावला आहे, असा आरोप संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी केलाय. मुख्य आका तसाच कायम ठेवायचा आणि त्याच्या खालची जी माणसं आहेत त्यांच्यावर कारवाई करायची, हीच भाजपाची राज्य करण्याची पद्धत असल्याचे संजय राऊत म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या :
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले