Vijay Shivatare । सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मास्टरमाईंड आहे, असा आरोप सातत्याने केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे. दररोज या प्रकरणी नवनवीन धक्कादायक खुलासे केले जात आहेत. (Santosh Deshmukh case update) दरम्यान, शिवसेनेचे नेते विजय शिवतारे ( Vijay Shivatre ) यांनी याबाबत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणात ज्या गोष्टी समोर आल्या आहेत त्या आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविणार असल्याचं शिवतारे यावेळी बोलताना म्हणाले. वेस्ट बंगालमध्ये 1967 साली अशाच पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली होती. तोच बेस मला परळीत दिसून येत आहे. जे मी या ठिकाणी लोकांकडून ऐकले ते भयानक आहे, असं विजय शिवतारे ( Vijay Shivtare ) म्हणाले.
“काही लोक इथे येऊन ओबीसी लोकांवर अन्याय होतो असे बोलतात हे चुकीचे आहे. देशमुख यांच्या हत्याऱ्यांना फासावर लटकवणे आवश्यक आहे. वाल्मिक कराड सारखा घरगडी असणारा माणूस पाच हजार कोटींचा मालक होतो, त्यामुळे तो किती शातीर आहे हे समजतं”, अशी प्रतिक्रिया विजय शिवतारे यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या :