Laxman Hake । राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलेलं आहे. एकीकडे संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत, तर दुसरीकडे मनोज जरांगे आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके ( Laxman Hake ) यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे.
अशातच एक मोठी बातमी समोर येतेय. ओबीसी नेते लक्ष्मण हाके( Laxman Hake ) यांना मनोज जरांगे (Manoj Jarange ) यांच्या समर्थकांकडून धमकी देण्यात आली आहे, असा आरोप हाकेंनी केला आहे.
धमकीचा व्हिडीओ देखील लक्ष्मण हाके यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये लक्ष्मण हाके फोनवर बोलत असून समोरील माणूस त्यांना धमकी देत असल्याचे दिसत आहे. उठसूठ तुम्ही मराठ्यांना बोलताय, मनोज जरांगेंना बोलताय, असं समोरचा माणूस म्हणाला. त्यावर लक्ष्मण हाके म्हणतायेत, “मनोज जरांगे यांनीही स्वत:चं घरदार बघाव ना.”
या आरोपांनांतर लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “मला राज्यभरातून शेकडो धमक्यांचे फोन येत आहेत, जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. मला शिवीगाळ केली गेली. मला जीवे मारण्याची धमकी दिलीय.”
महत्वाच्या बातम्या:
- Mahakumbh 2025 : कोण आहेत नागा साधू? शाही स्नानापूर्वी करतात ‘हे’ 17 अलंकार, जाणून घ्या सर्वकाही…
- अमित शहांच्या ‘त्या’ वक्तव्यावर Sanjay Raut यांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा…”
- “Santosh Deshmukh महिनाभरापासून होते अस्वस्थ, पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेच….”; पत्नीचा खळबळजनक खुलासा