Sanjay Raut । भाजपाचं अधिवेशन काल शिर्डीमध्ये पार पडलं. या अधिवेशनात बोलताना अमित शाह यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. फसवणूक करुन, लबाडी करुन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते, असं अमित शहांनी म्हंटल होतं. या टीकेला प्रत्युत्तर देत संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी चांगलंच सुनावलं आहे. बाळासाहेब ठाकरेंचा अपमान अमित शाह ( Amit Shah ) यांनी केला आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
Sanjay Raut On Amit Shah
“उद्धव ठाकरे यांना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे. ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर तुम्ही अजूनही पोट भरताय, त्यांचा हा घोर अपमान आहे. महाराष्ट्रात येऊन तुम्ही हे विधान करता आणि समोर बसलेले काही लोक त्यावर टाळ्या वाजवत होते, हा महाराष्ट्राचा अपमान आहे”, असं म्हणत संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी शहांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
अमित शहांचं वक्तव्य काय?
“उद्धव ठाकरेंनी आपल्याशी जो द्रोह केला, २०१९ ला विचारधारा सोडली आणि बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धातांशी तडजोड केली. फसवणूक करुन, लबाडी करुन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. १९७८ ते २०२४ पर्यंत महाराष्ट्रात अस्थिरतेचं राजकारण सुरु होतं. ते जनतेने संपवून दाखवलं.”
महत्वाच्या बातम्या :