Santosh Deshmukh । पोलिसांकडून संतोष देशमुख यांच्या हत्येचा कसून तपास सुरु आहे. त्यांना न्याय मिळावा यासाठी देशमुख कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली होती. याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी सात आरोपींना पकडले आहे. पकडलेल्या आरोपींमधील वाल्मिक कराडला वगळता सर्व आरोपींना मोक्का लावला आहे.
अशातच आता याप्रकारणी तपासादरम्यान संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख (Ashwini Deshmukh) यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. यामुळे संतोष देशमुख अस्वस्थ होते. वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेकडून ही धमकी मिळाली होती. तेव्हाच जर याचे गांभीर्य पोलीसांनी ओळखले असते तर संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता, अशी माहिती अश्विनी देशमुख यांनी दिली आहे.
Ashwini Deshmukh on Santosh Deshmukh murder
इतकेच नाही तर आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्यावर मोक्का लावावा तसेच अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात यावी. ॲड. उज्वल निकम (Ujjwal Nikam) किंवा ॲड. सतीश मानिंदे यांनी हा खटला न्यायालयात लढवला नाही तर संतोष देशमुख यांची पत्नी, मुलगी, भाऊ, भावजय आणि कुटुंबासह ग्रामस्थांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :