Santosh Deshmukh । मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी (Santosh Deshmukh murder case) दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहे. त्यांना न्याय मिळावा यासाठी राज्यात मोर्चे काढले जात आहेत. अशातच आता या प्रकरणी मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले आहे.
संतोष देशमुख यांच्या सर्व आरोपींना लवकरात लवकर पकडावा, आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्यावर मोक्का लावावा तसेच अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात यावी. ॲड. उज्वल निकम (Ujjwal Nikam) किंवा ॲड. सतीश मानिंदे यांनी हा खटला न्यायालयात लढवावा अशा मागण्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी केल्या आहेत.
Beed Crime
त्यांच्या या मागण्या मान्य झाल्या नाही तर संतोष देशमुख यांची पत्नी, मुलगी, भाऊ, भावजय आणि कुटुंबासह ग्रामस्थांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे. अंगावर पेट्रोल ओतुन जाळुन घेऊन सामूहिक आत्मदहन करणार असल्याचे निवेदन त्यांनी तहसीलदार यांना दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :