Share

“Walmik Karad चा राईट हँड गोटू गित्ते घरात घुसून मुलींना…”; अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट

संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणी संशयित असणाऱ्या वाल्मिक कराडचा (Walmik Karad) साथीदार गोट्या गित्तेबाबत (Gotya Gitte) अंजली दमानिया ( Anjali Damania ) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Published On: 

"Walmik Karad चा राईट हँड गोटू गित्ते घरात घुसून मुलींना..."; अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट

Walmik Karad । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणी संशयित असणाऱ्या वाल्मिक कराडचा (Walmik Karad) साथीदार गोट्या गित्तेबाबत (Gotya Gitte) अंजली दमानिया ( Anjali Damania ) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एका महिलेने गोट्या गीत्तेबाबत माहिती देत आरोप केले असल्याचं दमानिया यावेळी बोलताना म्हणाल्या. त्यांनतर गोट्या गीत्तेची माहिती घेऊन पोलिसांना दिली असल्याचंही दमानिया यांनी सांगितलं.

गोट्या गित्ते घरात घुसून मुलींना घेऊन जातो आणि फेकून देतो असा आरोप त्या महिलेने केला असल्याचं दमानियांनी सांगितलं. या घटनेची नोंद पोलीसही घेत नसल्याचं त्या म्हणाल्या. “हा घरात घुसतो , भीती दाखवून आईवडिलांसमोर मुलींना घेऊन जातो आणि पुन्हा आणून घरात फेकून देतो. हे ऐकलं तेव्हा थरकाप उडाला. अशांवर कारवाई देखील होत नाही. त्याच्याविरोधात पोलीस तक्रार घेत नाहीत”, असा गौप्यस्फोट अंजली दमानिया यांनी केलाय.

कोण आहे गोट्या गित्ते?

ग्यानबा मारुती गित्ते उर्फ गोट्या हा मुळ परळी तालुक्यातील नंदागौळचा रहिवासी आहे.  सध्या गोट्या गित्ते हा बँक कॉलनी परळी येथे राहत आहे. गोट्या गित्तेवर आतापर्यंत अनेक पोलीस ठाण्यात चोरी, हाफ मर्डर, दरोडे असे गुन्हे दाखल झाले आहेत. महाराष्ट्राबाहेर देखील त्याच्यावर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही