Santosh Deshmukh । पोलिसांकडून संतोष देशमुख यांच्या हत्येचा कसून तपास सुरु आहे. याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी सात आरोपींना पकडले आहे. पकडलेल्या आरोपींमधील वाल्मिक कराडला (Walmik Karad) वगळता एसआयटीने सर्व आरोपींना मोक्का लावला आहे.
वाल्मिक कराड याला देखील मोक्का लावावा या मागणीसाठी आता देशमुख कुटुंबीयांसह ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. अशात आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) हे सकाळपासून गायब झाले आहेत. इतकेच नाही तर त्यांचा फोनदेखील बंद आहे. धनंजय देशमुख यांनीदेखील पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन करायला सुरुवात केली आहे.
dhananjay deshmukh gone missing
संतोष देशमुख यांची हत्या होऊन एक महिना लोटला तरी या प्रकरणातील सर्व आरोपी अटक झाले नाहीत. इतकेच नाही तर मुख्य सुत्रधारावर खुनाचा गुन्हा दाखल नाही. त्यामुळे आता कराडवर खुनासह मोक्कांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- अमित शहांच्या ‘त्या’ वक्तव्यावर Sanjay Raut यांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा…”
- “Santosh Deshmukh महिनाभरापासून होते अस्वस्थ, पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेच….”; पत्नीचा खळबळजनक खुलासा
- संक्रांतीदिवशीचं Santosh Deshmukh यांच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थ करणार सामूहिक आत्महत्या, नेमकं प्रकरण काय?