Dhananjay Deshmukh | बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्येला ३५ दिवस उलटूनही अद्याप एक आरोपी फरार आहे. या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) वगळता उर्वरित आरोपींवर मोक्का कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाल्मिक कराडवर अद्याप मोक्काअंतर्गत कारवाई का झाली नाही?, असा सवाल उपस्थित करत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन करायला सुरुवात केली आहे. देशमुख कुटुंबीयांसह ग्रामस्थ देखील आक्रमक झाले आहेत.
“माझ्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी आंदोलन करणार”, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, पोलिसांनी माझी अजिबात चौकशी केली नाही. घटनाक्रम विचारला गेला नाही. गाडी सापडली, चिठ्ठी सापडली याबद्दलही काहीही विचारले नाही.”
त्याचबरोबर “मनोज दादांवरही केस टाकली जात आहे. न्याय मागताना केस दाखल केल्या जात असतील तर मी न्याय कशासाठी मागू?”, असा सवाल धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :