धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर, Manoj Jarange यांनी केला फोन; म्हणाले, “तुम्हाला काय झालं, तर मी यांचं…”

धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन करायला सुरुवात केली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे ( Manoj Jarange ) हे मस्साजोगमध्ये आले आहेत. त्यांनी स्वत: धनंजय देशमुख ( Dhananjay Deshmukh ) यांच्याशी मोबाइलवरुन संपर्क साधला व त्यांना खाली उतरण्याच आवाहन केलं.

Published On: 

धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर, Manoj Jarange यांनी केला फोन; म्हणाले, "तुम्हाला काय झालं, तर मी यांचं..."

Manoj Jarange ।  बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कसून तपास सुरु आहे. याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी सात आरोपींना पकडले आहे. पकडलेल्या आरोपींमधील वाल्मिक कराडला (Walmik Karad) वगळता एसआयटीने सर्व आरोपींना मोक्का लावला आहे.

वाल्मिक कराड याला देखील मोक्का लावावा या मागणीसाठी आता देशमुख कुटुंबीयांसह ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. अशात आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) हे सकाळपासून गायब झाले होते. इतकेच नाही तर त्यांचा फोनदेखील बंद होता. अखेर दुपारी पावणेबाराच्या सुमारास ते मस्साजोगमधील पाण्याच्या टाकीवर दिसले.

धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन करायला सुरुवात केली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे ( Manoj Jarange ) हे मस्साजोगमध्ये आले आहेत. त्यांनी स्वत: धनंजय देशमुख ( Dhananjay Deshmukh ) यांच्याशी मोबाइलवरुन संपर्क साधला व त्यांना खाली उतरण्याच आवाहन केलं.

Manoj Jarange Call to Dhananjay Deshmukh

“तुम्हाला काय झालं, तर मी यांचं जीण मुश्किल करेन”, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. तुम्ही खाली या, तुमची कुटुंबाला गरज आहे. आपल्याला संतोष भय्याला न्याय द्यायचा आहे. माझा समाज तुमच्या पाठिशी आहे. आत्महत्या करायची नाही, खाली या, अशी विनंती करत मनोज जरांगे धनंजय देशमुख यांची समजूत घालत आहेत. मात्र धनंजय देशमुख अजूनही खाली उतरले नाहीत. याबाबत पुढे नेमकं काय होतंय याकडे सर्वांचं लक्ष लागेलेलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

Journalist at Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही