Share

“लाजा नसल्यासारखं तुम्ही डबल गेम…”; देशमुख हत्याप्रकरणावरून Manoj Jarange मुख्यमंत्र्यांवर भडकले 

“गावातल्या एका आदर्श सरपंचाचा खून झाला. पण लाजा नसल्यासारखं तुम्ही डबल गेम खेळता अशी शंका येते”, असं म्हणत मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावलं आहे.

Published On: 

"लाजा नसल्यासारखं तुम्ही डबल गेम..."; देशमुख हत्याप्रकरणावरून Manoj Jarange मुख्यमंत्र्यांवर भडकले 

Manoj Jarange । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्येप्रकरणी त्यांचे बंधू धनंजय देशमुख हे स्वत: पाण्याच्या टाकीवर चढले होते. जोपर्यंत माझ्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी आंदोलन करणार, असा पवित्रा त्यांनी घेतला. यावेळी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी आंदोलनाला भेट दिली. यानंतर माध्यमांशी बोलताना मनोज जरांगेंनी सरकारबाबत संताप व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केलाय.

जरांगे म्हणाले, ” जर देशमुख कुटुंब तुम्हाला पाहून हताश होणार असेल तर तुम्ही अयशस्वी झाला आहात. तुम्हाला पाहून या कुटुंबीयांना धीर यायला हवा होता तो आला नाही. त्यांच्या लेकीनं, धनंजयनं छाती ठोकून आम्हाला न्याय मिळेल असं सांगायला हवं होतं. हे काम सरकार म्हणून मुख्यमंत्र्यांनी करणे अपेक्षित असतं. आरोपीलाच तुम्ही सांभाळायला लागलात.”

“गावातल्या एका आदर्श सरपंचाचा खून झाला. पण लाजा नसल्यासारखं तुम्ही डबल गेम खेळता अशी शंका येते”, असं म्हणत मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावलं आहे. यांनी सरकारमध्ये सांगायचं कुटुंबाशी गोड बोलतो दुसरीकडे आरोपी सोडून द्यायचे. जर आता आरोपी सुटला तर धनंजय मुंडे यांच्या टोळीचं जगणं मुश्किल करेन, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही