Share

“वजीराच्या बेशिस्त प्याद्याला वाचवण्यासाठी…”; बीड प्रकरणावरून Rohit Pawar यांचा अजितदादांवर खळबळजनक आरोप

by MHD
Rohit Pawar vs ajit pawar on santosh deshmukh case

Rohit Pawar। संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरण दिवसेंदिवस वेगळे वळण घेत आहे. याच प्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री धनंजय मुंडे यांना विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. अशातच आता शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

“जर आरोपी विष्णू चाटेचा मोबाईल सापडला तर सर्वकाही समोर येईल. पण अजूनही या आरोपीचा मोबाईल सापडत नाही. विरोधकांचे फोन क्षणार्धात टॅप करू शकणाऱ्या यंत्रणेला आरोपीच्या मोबाईलचा साधा CDR सुद्धा का मिळत नाही? हे पोलीस यंत्रणेचे आणि पर्यायाने गृहमंत्र्यांचे अपयश नाही का?,” असा आरोप रोहित पवार यांनी केला.

“बीड आणि परभणी दोन्ही प्रकरणात तपास एका पॉइंटला येऊन थांबला असून तपास आता गती घ्यायला तयार नाही. बीड प्रकरणात सभागृहात मुख्यमंत्र्यांनी न्यायालयीन तपासणी करण्याची घोषणा करुन 25 दिवस झालेत पण अजूनही समिती कार्यान्वित झाली नाही. सरकार आता पुरावे नष्ट होण्याची वाट पाहत आहे का?”, संतप्त सवाल रोहित पवार यांनी केला.

Rohit Pawar on Ajit Pawar

पुढे ते म्हणाले, “राज्यकर्त्यांनी मिळमिळीत भूमिका बघता जनतेचा कायदा सुव्यवस्थेवरचा विश्वास दिवसेंदिवस कमी होत आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) साहेबांनी आपली कार्यक्षमता तर अजितदादांनी आपला निडरपणा दाखवायला हवा. वजीराच्या बेशिस्त प्याद्याला वाचवण्यासाठी राजानेच कायद्याची मोडतोड करून संपूर्ण राज्यालाच वेठीस धरायचे नसते आणि ते राज्याच्या हिताचेही नसते, याचे स्मरण मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांनी ठेवायला हवे.”

महत्त्वाच्या बातम्या :

Sharad Pawar group leader Rohit Pawar has targeted Deputy Chief Minister Ajit Pawar and Minister Dhananjay Munde over the Santosh Deshmukh murder case.

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now