Missile Attack On Israel : इस्रायल आणि हमास (Israel and Hamas War) यांच्यात सुरु असणाऱ्या युद्धात आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी देखील झाले आहे. त्यामुळे युद्ध कधी संपणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे.
या बातमीनुसार मंगळवारी गाझामध्ये (Gaza) झालेल्या स्फोटात पाच इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाला आहे तर 8 सैनिक जखमी झाले आहे. माहितीनुसार, मंगळवारी सकाळी येमेनच्या हुथी बंडखोरांनी मध्य इस्रायलला लक्ष्य करून मिसाईल हल्ला केला. मिसाईल हल्ल्यामुळे इस्रायलमध्ये सायरन वाजले आणि लोक बॉम्ब आश्रयस्थानांमध्ये पळून गेले.
इस्रायली लष्कराने म्हटले आहे की त्यांनी येमेनमधून डागण्यात आलेले मिसाईल रोखण्याचे अनेक प्रयत्न केले आणि “मिसाईल रोखण्यात आले असण्याची शक्यता आहे.” इस्रायलमधील मॅगेन डेव्हिड अॅडोम आपत्कालीन सेवेने सांगितले की, मिसाईलमुळे किंवा ढिगारा पडल्याने कोणतीही दुखापत झाली नाही, परंतु काही लोक आश्रयस्थानात पळून जाताना जखमी झाले.
इस्रायली लष्कराने असेही म्हटले आहे की, पूर्वीचे एक मिसाईल इस्रायली हद्दीत प्रवेश करण्यापूर्वीच रोखण्यात आले होते. गाझामध्ये इस्रायली सैनिकांचा मृत्यू इस्रायली लष्कराने सांगितले की, उत्तर गाझा पट्टीतील एका इमारतीत झालेल्या स्फोटात पाच सैनिक ठार झाले आणि आठ जण गंभीर जखमी झाले. स्फोटामुळे इमारत कोसळली, परंतु त्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
840 Israeli soldiers killed
शिन्हुआ वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे की, मारले गेलेले सर्व सैनिक नाहल ब्रिगेडच्या रिकॉनिसन्स बटालियनचे होते. यामध्ये 23 वर्षीय टीम कमांडरचाही समावेश होता. जखमी झालेले 8 सैनिकही याच बटालियनचे आहेत आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर, ऑक्टोबर 2023 पासून सुरू असलेल्या युद्धात मारल्या गेलेल्या इस्रायली सैनिकांची एकूण संख्या 840 वर पोहोचली आहे.
महत्वाच्या बातम्या :