Mahindra XUV 3XO EV : भारतीय बाजारात वाढत असणाऱ्या इलेक्ट्रिक कार्सचा (Electric Cars) क्रेझ पाहता आता ऑटो कंपन्या एकापेक्षा एक मस्त मस्त कार्स लाँच करत आहे किंवा करण्याची तयारी करत आहे. यातच एक मोठी अपडेट समोर आली आहे.
या अपडेटनुसार आता महिंद्रा (Mahindra) देखील आणखी एक इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात (Indian Market) लाँच करण्याची तयारी करत आहे. होय, गेल्या वर्षी बाजारात महिंद्राने एसयूव्ही XUV 3XO लाँच केली होती. या एसयूव्ही कारने बाजारात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर आता महिंद्रा लवकरच या कारला इलेक्ट्रिक अवतारात लाँच करणार आहे. सध्या या कारवर टेस्टिंग सुरु असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात येत आहे.
XUV 3XO इलेक्ट्रिक भारतीय बाजारात टाटा पंच इलेक्ट्रिक कारशी स्पर्धा करणार आहे. त्यामुळे या कारमध्ये एकापेक्षा एक मस्त मस्त फीचर्स असणार असल्याचा देखील दावा करण्यात येत आहे. डिजाईनबद्दल बोलायचं झालं तर या कारच्या फ्रंटमध्ये राउंड प्रोजेक्टर हेडलाइट्स आणि C-आकाराच्या LED DRLs सह समान स्प्लिट हेडलॅम्प सेटअपसह पाहायला मिळणार आहे. याच बरोबर या कारमध्ये सेफ्टीसाठी 360 -डिग्री कॅमेरा फिचर देखील देण्यात येणार आहे. भारतीय बाजारात ही कार ऑटो एक्स्पो 2025 मध्ये सादर होऊ शकते. या कारची किंमत 12 ते 15 लाख रुपयांच्या दरम्यान असणार असल्याचं देखील बोलण्यात येत आहे.
Mahindra XUV 3XO Features
दुसरीकडे महिंद्रा XUV 3XO भारतीय बाजारात तुफान विक्री होत आहे. बाजारात या कारची किंमत 7.49 लाख रुपयांपासून सुरू होते. सुरक्षेच्या बाबतीत याला 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. कारमध्ये 3 इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये 1.2L टर्बो पेट्रोल इंजिनचा समावेश आहे जे 82kW पॉवर आणि 200 Nm टॉर्क निर्माण करते.
याशिवाय, त्याचे दुसरे इंजिन देखील 1.2 लिटर टर्बो पेट्रोल आहे जे 96 किलोवॅट पॉवर आणि 200 एनएम टॉर्क देते. त्याचे तिसरे 1.5 लिटर टर्बो डिझेल इंजिन 86 किलोवॅट पॉवर आणि 300 एनएम टॉर्क निर्माण करते. ही इंजिने मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेली आहेत आणि 21.2 किमी/लीटर पर्यंत मायलेज देतात.
महत्वाच्या बातम्या :