Ligier Mini EV : गेल्या काही वर्षांपासून भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कार्सची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने अनेक इलेक्ट्रिक कार्स लाँच होताना दिसत आहे. मात्र आता देखील दमदार रेंज आणि पावरफुल बॅटरीसह येणाऱ्या इलेक्ट्रिक कार्सची (Electric Cars) किंमत जास्त असल्याने अनेक ग्राहक इलेक्ट्रिक कारला स्वतःपासून दूर ठेवत आहे. मात्र आता भारतीय बाजरात अवघ्या एक लाखात इलेक्ट्रिक कार लाँच होण्याची शक्यता आहे.
सध्या भारतीय आणि विदेशी ऑटो कंपन्या कमी किमतीच्या इलेक्ट्रिक कारवर वेगाने काम करत आहे. त्यापैकी एक म्हणजे लिगियर. माहितीनुसार भारतीय बाजारपेठेमध्ये लिगियर मिनी इलेक्ट्रिक कार (Ligier Mini EV) लाँच करण्याची तयारी करत आहे. ही इलेक्ट्रिक कार 2 सीटर असून युरोपियन मॉडेल वर आधारित असणार आहे. माहितीनुसार सिंगल चार्ज मध्ये इलेक्ट्रिक कार 63 किमी ते 192 किमीपर्यंत रेंज देऊ शकते आणि ही इलेक्ट्रिक कार भारतात 1 लाख रुपयांच्या किमतीसह लॉन्च होण्याची शक्यता आहे.
बॅटरी आणि रेंज
लिगियर मिनी इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारपेठेत G.OOD, I.DEAL, E.PIC आणि R.EBEL अशा चार व्हेरियंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच बरोबर 4.14 kWh, 8.2 kWh आणि 12.42 kWh असे 3 बॅटरी पॅक पर्याय येणार आहे. त्यामुळे ही इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जमध्ये 63 किमी, 123 किमी आणि 192 किमीची रेंज देऊ शकते. मात्र भारतीय बाजारातील इलेक्ट्रिक कार कधी लॉन्च होणार याबाबत आत्तापर्यंत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
Design, Interior and Features
लिगियर मिनी इलेक्ट्रिक कार आकाराने लहान असणार आहे. तसेच ही कार भारतात मोपेड डिझाइनमध्ये येऊ शकते. या कारमध्ये 12-13 इंचाचे व्हील्स मिळू शकते. तर फ्रंटमध्ये स्लिम ग्रिलसह एलईडी, डीआरएल आणि गोल हेडलाइट्स मिळणार आहे. तर रियरमध्ये मोठ्या काचेसह टेलगेट उपलब्ध असेल. तर साइड लूक थोडा स्पोर्टी दिसू शकतो आणि येथे साइड बॉडी क्लॅडिंग त्याला एक मजबूत लूक देण्यास मदत करते.
माहितीनूसार या कारचे इंटीरियर स्पोर्टी असेल. 10-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो सपोर्ट, पॉवर स्टीअरिंग, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोलसह हॉट ड्रायव्हर सीट आणि कॉर्नर एसी व्हेंट्स सारखी फीचर्स देखील पाहायला मिळू शकते.
महत्वाच्या बातम्या :