Onion Benefits : आपल्या देशात प्रत्येक घरी दररोज स्वयंपाक करताना कांद्याचा (Onion) वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. तर दररोज अनेकजण कच्चा कांदा सॅलड म्हणून जेवणात खातात. कांद्यामुळे शरीराला अनेक फायदे देखील मिळतात. कांदा हा सल्फर आणि अँटिऑक्सिडंट्सचा स्रोत आहे. जर ते दररोज खाल्ले तर हृदयाचे आरोग्य आणि पचनाच्या समस्या दूर होतात. दररोज कच्चा कांदा खाणे आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे ते जाणून घेऊया?
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात खनिजे असतात, ज्यामुळे शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण देखील नियंत्रित होते. अनेकजण दररोज लिंबाचा रस आणि काळी मिरी पावडरसह कच्चा कांदा खातात ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. शिवाय, दररोज कच्चा कांदा खाल्ल्याने सर्दी आणि खोकला सहज होत नाही. मात्र दररोज कच्चा कांदा खाणे काही लोकांसाठी हानिकारक असू शकते.
कच्चा कांदा खाण्याचे फायदे
दररोज कच्चा कांदा खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. याच बरोबर कांद्यामध्ये काही असेल बॅक्टेरिया असतात जे आपल्या आतड्यांना निरोगी ठेवतात. तसेच कच्चा कांदा खाल्ल्याने फ्लूसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. याचबरोबर कच्चा कांदा खाल्ल्याने इन्सुलिनची पातळी नियंत्रणात राहते आणि कच्चा कांदा खाल्ल्याने रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून बचाव होतो, ज्यामुळे रक्ताभिसरण चांगले राहते.
कच्च्या कांद्याचे हानिकारक परिणाम
काही लोकांना कांदे पचवण्यास त्रास होतो त्यामुळे त्यांना पोटफुगी आणि आम्लपित्त येऊ शकते. कच्चा कांदा खाल्ल्यानेही छातीत जळजळ होऊ शकते. कच्चा कांदा खाल्ल्याने रक्त पातळ होते. त्यामुळे कोणी रक्त पातळ करणारे औषध घेत असेल तर त्याने कच्चा कांदा काळजीपूर्वक खावा नाहीतर त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
किती कांदा खाणे योग्य आहे? (How much onion is okay to eat?)
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, एखाद्या व्यक्तीने दररोज अर्धा ते एक कच्चा कांदा खावा. हे प्रमाण आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि सर्वांसाठी योग्य आहे.
महत्वाच्या बातम्या :