Dark Spot | चेहऱ्यावरील काळ्या डागांपासून सुटका मिळवायची असेल तर ‘हे’ घरगुती सोपे उपाय वापरून बघा

Dark Spot | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल अनियमित जीवनशैली आणि अयोग्य खाण्यापिण्याचे सवयींमुळे अनेकांना चेहऱ्यावर डाग ( Dark Spot ) येतात.

या समस्येवर मात करण्यासाठी अनेक लोक केमिकल युक्त उत्पादनांचा वापर करतात. मात्र, हे उत्पादन त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात.

त्यामुळे या समस्येवर  ( Dark Spot ) मात करण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक उपायांचा अवलंब करू शकतात. हे उपाय केल्याने चेहऱ्यावरील काळे डाग सहज दूर होऊ शकतात. चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी खालील घरगुती पर्याय वापरून बघा.

बटाटा ( Potato-For Dark Spot)

चेहऱ्यावरील डाग  ( Dark Spot ) दूर करण्यासाठी बटाट्याची साल उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला बटाटा सालीसह किसून घ्यावा लागेल.

त्यानंतर तुम्हाला ही पेस्ट दिवसभरातून दोनदा चेहऱ्यावर लावून मसाज करावी लागेल. साधारण दहा मिनिटे मसाज केल्यानंतर तुम्हाला ते मिश्रण चेहऱ्यावर अर्धा तास तसेच राहू द्यावे लागेल.

त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा कोमट पाण्याने धुवावा लागेल. साधारण दहा दिवस ही प्रक्रिया केल्याने चेहऱ्यावरील काळे डाग दूर होऊ शकतात.

मुलतानी माती आणि कोरफड ( Multani mati and aloe vera-For Dark Spot)

चेहऱ्यावरील काळे डाग  ( Dark Spot ) दूर करण्यासाठी मुलतानी माती आणि कोरफड एक उत्तम पर्याय ठरू शकतो. यासाठी तुम्हाला याचा एक फेस पॅक तयार करून घ्यावा लागेल.

हा फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला मुलतानी मातीमध्ये कोरफडीचा गर, हळद आणि थोडंसं दूध मिसळून घ्यावं लागेल.

हे मिश्रण तुम्हाला साधारण अर्धा तास चेहऱ्यावर लावून ठेवावं लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल.

लिंबाचा रस आणि चंदन पावडर ( Lemon juice and sandalwood powder-For Dark Spot)

चेहऱ्यावरील काळ्या डागाच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही लिंबाचा रस आणि चंदनाच्या पावडरचा वापर करू शकतात.

यासाठी तुम्हाला एक चमचा लिंबाच्या रसामध्ये आवश्यकतेनुसार चंदन पावडर आणि मध मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर हे मिश्रण तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर लावावे लागेल.

हे मिश्रण सुकल्यानंतर तुम्हाला ते सामान्य पाण्याने स्वच्छ धुवावे लागेल. आठवडाभर या मिश्रणाचा वापर केल्याने तुमचा चेहरा डाग मुक्त होऊ शकतो.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.