IND vs SA | टीम इंडियाला मोठा झटका; वर्ल्डकपमध्ये धडाकेबाज कामगिरी करणारा खेळाडू दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकणार?

IND vs SA | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय संघ लवकरच दक्षिण आफ्रिकेच्या संघाला भिडणार आहे. कारण 10 डिसेंबर 2023 पासून भारत आणि दक्षिण आफ्रिका ( IND vs SA ) यांच्यामध्ये मालिका सुरू होणार आहे.

या दौऱ्यादरम्यान दोन्ही संघांमध्ये  ( IND vs SA ) दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे.

यानंतर वर्ल्डकपमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा खेळाडू या मालिकेमध्ये  ( IND vs SA ) खेळणार नसल्याचं बोललं जात आहे.

Mohammed Shami did an excellent performance in ODI World Cup 2023

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा 2023 मध्ये मोहम्मद शमीने ( Mohammed Shami ) उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या स्पर्धेमध्ये त्याने  तब्बल 24 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.

अशात दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी  ( IND vs SA ) त्याची संघात निवड करण्यात आली आहे. मात्र, त्याची संघात निवड झाली असली तरी त्याची उपलब्धता त्याच्या फिटनेसवर ठरवली जाईल, असं बीसीसीआईने सांगितलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, पुढच्या आठवड्यामध्ये मोहम्मद शमी फिटनेस तपासणी करण्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट ॲकॅडमीमध्ये दाखल होणार आहे. त्याने जर ही फिटनेस टेस्ट पास केली तर तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध  ( IND vs SA ) होणाऱ्या मालिकेत सहभागी होऊ शकतो.

दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका  ( IND vs SA ) यांच्यामध्ये दोन सामन्याची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

यामध्ये रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, विराट कोहली, शुभमन गिल, इशान किशन, ऋतुराज गायकवाड, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, के एल राहुल, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद शामी यांचा समावेश आहे.

मोहम्मद शमीचा संघात समावेश झाला असला तरी त्याच्या फिटनेस टेस्टनंतर तो ही मालिका  ( IND vs SA ) खेळणार की नाही? याबाबत स्पष्ट होणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.