Ravi Bishnoi । ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी२० सीरीजमध्ये रवि बिश्नोईची दमदार कामगिरी;  सीरीजमध्ये घेतल्या सर्वाधिक विकेट 

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ravi Bishnoi । भारताचा युवा लेग-स्पिनर रवी बिश्नोईला त्याच्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ( IND vs Aus T20 ) कामगिरीसाठी मालिका सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. रवी बिश्नोईने 5 सामन्यात 9 विकेट्स घेतल्या आणि सीरीजमध्ये सर्वाधिक विकेट त्याने घेतल्या आहेत.

4 डिसेंबर, रविवारी एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू येथे झालेल्या रोमांचक 5व्या T20I सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ( IND vs Aus T20 ) मालिका 4-1 ने जिंकली.

रवी बिश्नोईने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5व्या T20 सामन्यात 4 षटकात 2 विकेट्स घेतल्या आणि 29 धावा दिल्या. भारताने 6 धावांनी हा सामना जिंकला. 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी ( T20 World Cup 2024 ) भारताच्या संघात स्थान मिळवण्यासाठी बिश्नोई ( Ravi Bishnoi ) चांगली कामगिरी करत आहे.

रवी बिश्नोई चेंडू थोडा वेगाने टाकतो आणि चेंडू स्लाइड करतो. त्याची गुगली खेळणे फलंदाजांसाठी सोपे नाही. बिश्नोईने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेत टीम इंडियाला यश मिळवून दिले. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेत रवी बिश्नोईचा ( Ravi Bishnoi ) इकॉनॉमी रेट 8.20 होता.

Indian Premier League Ravi Bishnoi

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर रवी बिश्नोईने ( Ravi Bishnoi ) गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ऑस्ट्रेलियात झालेल्या T20 विश्वचषक ( T20 World Cup) संघात निवड होण्यासाठी तो प्रबळ दावेदार होता, पण त्यावेळी युझवेंद्र चहलला संघात स्थान मिळाले.

रवी बिश्नोई हा जोधपूरच्या बादील गावात राहात होता नंतर त्यांचे कुटुंब जोधपूरमध्ये राहायला आले.  सुरवातीला रवी बिश्नोई ( Ravi Bishnoi ) शेतात गोलंदाजी करत असे. रवी बिश्नोईच्या कामगिरीवरून त्याला जोधपूरच्या क्रिकेट अकादमीमध्ये सामील होण्याची संधी मिळाली आणि त्याने तिथे प्रशिक्षण घेतले.

लहानपणी रवी बिश्नोई शेतातील खडबडीत जमिनीवर सराव करत होता. एक वेळ अशी आली जेव्हा रवी बिश्नोईची अंडर-16 संघात निवड झाली नाही आणि त्याच्या वडिलांनी त्याला क्रिकेट सोडण्यास सांगितले. त्यानंतर प्रशिक्षक प्रद्योत सिंग यांनी रवीच्या ( Ravi Bishnoi ) वडिलांशी बोलून त्यांची समजूत काढली. जोधपूरमध्ये रवी बिश्नोई यांनी प्रद्योत सिंग यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवले.

रवीने ( Ravi Bishnoi ) अंडर-19 विश्वचषकादरम्यान लेगस्पिन गोलंदाजी करत आपली छाप सोडली होती. रवी भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी चमकदार कामगिरी करेल, असे तेव्हाच क्रिकेट प्रेमींना वाटत होते.

Ravi Bishnoi T20 World Cup 2024 

रवी बिश्नोईने भारतासाठी आतापर्यंत 1 एकदिवसीय आणि 21 टी-20 सामने खेळले आहेत. रवीने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात 1 बळी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 34 बळी घेतले आहेत. आगामी T20 विश्वचषक वेस्ट इंडिज आणि यूएसए मध्ये होणार आहे.

तिथे खेळपट्टी फिरकीपटूंना अनुकूल राहण्याची शक्यता आहे. बिश्नोईची ( Ravi Bishnoi ) कामगिरी अशीच सुरू राहिल्यास त्याला विश्वचषक संघात स्थान मिळू शकते.

महत्वाच्या बातम्या