Hardik Pandya | हार्दिक पांड्या गुजरातला रामराम ठोकणार? MI मध्ये परतणार असल्याच्या चर्चा सुरू

Hardik Pandya | टीम महाराष्ट्र देशा: एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर क्रिकेट चाहते आता इंडियन प्रीमियर लीग ( Indian Premier League ) म्हणजेच आयपीएलच्या ( IPL ) पुढच्या हंगामाची आतुरतेने वाट बघत आहे.

दुबईमध्ये 19 डिसेंबर रोजी आयपीएल 2024 हंगामासाठी लिलाव पार पडणार आहे. तत्पूर्वी 26 नोव्हेंबरला ट्रान्सफर विंडोचा अवधी संपत आहे.

अशात सर्व आयपीएल फ्रेंचाईजी त्यांच्या गरजेनुसार खेळाडूंची निवड करताना दिसत आहे. यादरम्यान हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) मुंबई इंडियन्समध्ये ( Mumbai Indians ) परतणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहे. परंतु, मुंबई इंडियन्सने याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

क्रिकइन्फो वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्स फ्रॅंचाईजी 15 कोटी रुपये खर्चून हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya ) पुन्हा आपल्या संघात सामील करणार आहे.

मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला  ( Hardik Pandya ) संघात सामील केलं तर जोफ्रा आर्चर किंवा कॅमेरेन ग्रीन यांना संघ सोडावा लागू शकतो, अशा चर्चा आहे.

गेल्या आयपीएलमध्ये हे दोन्ही खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये नव्हते. त्यामुळे हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya ) संघात सामील केल्यानंतर या दोघांना संघ सोडावा लागू शकतो.

Gautam Gambhir resigned as Lucknow Super Giants mentor 

दरम्यान, आयपीएल 2024 मध्ये आपल्याला अनेक संघात बदल झालेला दिसणार आहे. आयपीएल 2024 मध्ये गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) लखनऊ सुपर जायंट्स ( Lucknow Super Giants ) संघासोबत न दिसता कोलकत्ता नाईट रायडर्स Kolkata Knight Riders ) संघासोबत दिसणार आहे.

गौतम गंभीरने लखनऊ सुपर जायंट्सच्या मार्गदर्शक पदाचा राजीनामा दिला आहे. आयपीएल 2024 मध्ये तो कोलकाता नाईट रायडर्सचा मार्गदर्शक म्हणून काम करणार आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.