Hardik Pandya | हार्दिक पांड्या कसोटी संघात करणार पुनरागमन?

Hardik Pandya | टीम महाराष्ट्र देशा: टीम इंडियाने हार्दिक पांड्या (Hardik Pandya) च्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्धची मालिका 2-1 ने जिंकली आहे. गेल्या टी-20 मालिकेमध्ये भारतीय संघाने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी केली. हार्दिक पांड्याने पाठीच्या दुखापतीतून सावरल्यानंतर एकदिवसीय आणि टी-20 संघात पुनरागमन केले आहे. मात्र, हार्दिक पांड्या कसोटी संघात दिसत नाहीये. चाहते त्याला कसोटी संघात पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.

न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा सामना जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याला कसोटी पुनरागमनाबाबत विचारण्यात आले होते. तेव्हा तो म्हणाला, “जेव्हा मला वाटेल की कसोटी संघामध्ये पुनरागमन करण्याची ही योग्य वेळ आहे त्यावेळी मी संघात प्रवेश करेल. सध्या तरी मी पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत आहे. जर शरीराने आणि वेळेने मला साथ दिली तर मी लवकरच कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.”

हार्दिक पांड्याने न्युझीलँडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये 41 च्या सरासरीने 82 धावा केल्या होत्या. तर या सामन्यांमध्ये त्याने चार विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. त्याचबरोबर न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेमध्ये हार्दिक पांड्याने 33 च्या सरासरीने 66 धावा आपल्या नावावर केल्या आहेत. तर या मालिकेमध्ये पाच विकेट्स घेत तो संघातील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 9 ते 13 फेब्रुवारी दरम्यान नागपूरमध्ये पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. या मालिकेतील दुसरा सामना नवी दिल्ली येथे 17 ते 21 फेब्रुवारी दरम्यान खेळण्यात येणार आहे. 1 ते 15 मार्च दरम्यान या मालिकेतील तिसरा सामना धर्मशाळा येथे होणार आहे. तर या मालिकेतील चौथा आणि अंतिम सामना 9 ते 13 मार्च दरम्यान अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या