Share

Sanjay Raut VS Narayan Rane | संजय राऊत यांची नारायण राणेंना कायदेशीर नोटीस; नेमकं प्रकरण काय?

Sanjay Raut VS Narayan Rane। मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राणेंविरोधात बदनामीचा दावा दाखल केला आहे. सार्वजनिक मंचावरुन राणेंनी खोटे आरोप केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी राणेंनी राऊतांविरोधात वक्तव्य केलं होतं. ‘‘२००४ साली नारायण राणे … Read more

Published On: 

Sanjay Raut VS Narayan Rane। मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राणेंविरोधात बदनामीचा दावा दाखल केला आहे. सार्वजनिक मंचावरुन राणेंनी खोटे आरोप केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी राणेंनी राऊतांविरोधात वक्तव्य केलं होतं. ‘‘२००४ साली नारायण राणे यांनीच संजय राऊत यांना खासदार केलं. त्यावेळी त्यांचं नाव मतदार यादीत नव्हतं. संजय राऊत हे आपल्यामुळे खासदार झाले. त्यासाठी आपण पैसे खर्च केले’ असा दावा राणे यांनी केला होता. राणेंच्या या वक्तव्यावर संजय राऊत यांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे बदनामी झाल्याचा आरोप करत राऊतांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. नोटिशीबाबत ट्विटरवरुन संजय राऊत यांनी माहिती दिली आहे.

तुम्ही मला खासदार केलं तर तेव्हा मग शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे काय करत होते?, असा सवाल संजय राऊत यांनी केलाय. २००४ साली मी सामनाचा संपादक होतो. मतदार यादीत नाव नव्हतं म्हणतात. मी काय बांग्लादेशी किंवा पाकिस्तानी नागरिक आहे का?, असं म्हणत राऊतांनी राणेंना सुनावलं.

माझं शिक्षण विद्यापीठातून झालंय. अनेक निवडणुकात मी मतदान केलं. २००४ साली माझं नाव मतदार नोंदणी यादीत होतं. त्यांनी यादी चेक करावी, असं राऊत म्हणाले. नारायण राणेंनी या नोटिसीनंतर माफी मागितली नाही तर न्यायालयात त्यांच्यावर खटला दाखल करेन. किरीट सोमय्यांवर देखील मी खटला दाखल करणार आहे. फक्त मीच नाही तर शिवसेनेच्या ज्या नेत्यांवर अशा प्रकारचे आरोप होत आहेत ते सर्व नेते खटले दाखल करणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही