Share

Oily Skin | तेलकट त्वचेच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी बेसनाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

🕒 1 min read Oily Skin | टीम महाराष्ट्र देशा: त्वचेची काळजी घेण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. कारण प्रत्येकालाच निरोगी आणि चमकदार त्वचा हवी असते. त्वचेची काळजी घेण्यासाठी बहुतांश लोक बेसन पिठाचा वापर करतात. कारण बेसनाच्या मदतीने त्वचेवरील अनेक समस्या सहज दूर होतात. बेसन पीठ तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यास देखील मदत करते. बेसन पिठाचे … Read more

Published On: 

🕒 1 min read

Oily Skin | टीम महाराष्ट्र देशा: त्वचेची काळजी घेण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. कारण प्रत्येकालाच निरोगी आणि चमकदार त्वचा हवी असते. त्वचेची काळजी घेण्यासाठी बहुतांश लोक बेसन पिठाचा वापर करतात. कारण बेसनाच्या मदतीने त्वचेवरील अनेक समस्या सहज दूर होतात. बेसन पीठ तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यास देखील मदत करते. बेसन पिठाचे फेसपॅक वापरून तुम्ही त्वचेवरील तेलकटपणा दूर करू शकतात. कारण यामध्ये अँटीबॅक्टरियल आणि अँटी-इम्प्लिमेंटरी गुणधर्म आढळून येतात. त्वचेवरील तेलकटपणा कमी करण्यासाठी तुम्ही बेसनाचे पुढील फेसपॅक वापरू शकतात.

बेसन आणि दही

दही आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. दह्यामध्ये अँटीबॅक्टरियल गुणधर्म आढळतात जे त्वचेला संसर्गापासून वाचवू शकतात. दही आणि बेसनाचा फेसपॅक लावल्याने त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जाण्यास मदत होते. यासाठी तुम्हाला एका भांड्यात दोन चमचे दही आणि दोन चमचे बेसन पीठ घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला या दोन्हींची पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. हे मिश्रण तुम्हाला वीस मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल.

बेसन आणि लिंबू

लिंबामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते. लिंबाच्या मदतीने त्वचेवरील डेड स्किन निघून जाण्यास मदत होते. त्याचबरोबर बेसन आणि लिंबाच्या फेसपॅकने त्वचेवरील तेलकटपणा (Oily Skin) कमी होण्यास मदत होते. यासाठी तुम्हाला दोन चमचे बेसनामध्ये एक चमचा लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. या मिश्रणामध्ये पाणी घालून तुम्हाला त्याची घट्ट पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण दहा ते पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही या फेसपॅकचा वापर करू शकतात.

बेसन आणि हळद

त्वचेवरील तेलकटपणा दूर करण्यासाठी तुम्ही बेसन आणि हळदीचा वापर करू शकतात. हळदीमध्ये अँटीबॅक्टरियल आणि अँटी-इम्प्लिमेंटरी गुणधर्म आढळून येतात. बेसन आणि हळदीच्या फेसपॅकने चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढण्यासाठी दोन चमचे बेसनामध्ये चिमूटभर हळद मिसळून पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. ही पेस्ट तुम्हाला दहा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

Health

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या