Job Opportunity | ST महामंडळामध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘हे’ उमेदवार करू शकतात अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील दहावी पास उमेदवारांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे. MSRTC नागपूर विभागात भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. लवकरच या भरती प्रक्रियेची अंतिम तारीख जाहीर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये तब्बल 27 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. यामध्ये मेकॅनिक (मोटार व्हेईकल), मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर, वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), वेल्डर (गॅस व इले.), पेंटर (सामान्य), डिझेल मेकॅनिक इत्यादी पदांचा समावेश आहे.

राज्य शासनाच्या या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार आठवी पास, दहावी पास, बारावी पास, आयटीआय, डिप्लोमा यापैकी कोणतेही परीक्षा उत्तीर्ण असलेला असावा. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.

MSRTC या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून निवड झालेल्या उमेदवारांना नागपूरमध्ये नोकरीची संधी (Job Opportunity ) उपलब्ध होईल. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार http://www.msrtc.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.