Sudhir Mungantivar | नागपूरमध्ये भाजपाच्या पराभवानंतर सुधीर मुनगंटीवार म्हणाले; “गेली १२ वर्षे…”

Sudhir Mungantivar । मुंबई : विधानपरिषदेच्या 2 पदवीधर, 3 शिक्षक मतदारसंघांचा आज निकाल लागला. कोकणात भाजपच्या उमेदवाराचा विजय झालाय. राज्यातील पाच मतदार संघाच्या निवणूका होत होत्या मात्र नागपूर आणि नाशिक मतदार संघाच्या उमेदवारांकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिले होते.

नागपूर मतदार संघ हा भाजपचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असल्याने महाविकास आघाडीनेही नागपूरसाठी जोरदार तयारी केली होती. मात्र नागपूरमध्ये भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. यावर सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“नागपूरची जागा २०१०च्या आधी १८ वर्ष काँग्रेस समर्थित उमेदवारांच्या ताब्यात होती. मी भाजपाचा प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर १८ वर्षांनंतर ती जागा आमच्या ताब्यात आली. गेली १२ वर्षी ती जागा भाजपाकडे होती.” त्यामुळे पराभवाचं चिंतन करावं लागेल. एका निवडणुकीचा परिणाम दुस-या निवडणुकीवर होत नाही. कसबा, पिंपरी दोन्ही निवडणुका आम्ही जिंकू”, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय.

“साधारणत: विजय झाल्यानंतर माजायचं नाही, पराभव झाल्यानंतर गाजायचं नाही, या तत्वावर आम्ही काम करतो. त्यामुळे या पराभवानंतर नक्कीच विश्लेषण करू. जिथे उणीव असेल, ती भरून काढण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही प्रयत्न करू”, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या :