Nitesh Rane | ”उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना आयफोन वापरण्याच्या लायकीचं ठेवलं आहे का?”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Nitesh Rane | मुंबई :  राज्यात भाजप-शिवसेनेचं (BJP-Shiv Sena) सरकार असताना विरोधी पक्षातील नेत्यांच्या फोन टॅपिंगचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे रश्मी शुक्ला फोन टॅपिंग (Phone Tapping) प्रकरणानंतर खबरदारी म्हणून उद्धव ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकारी, नेते, आमदार, खासदार यांना फक्त आयफोन वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती समोर येतेय. याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी माहिती दिली आहे. यावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे.

“उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना आयफोन वापरण्याच्या लायकीचं ठेवलं आहे का?”, असा सवाल नितेश राणेंनी केला आहे. पुढे ते म्हणाले, “कधी वडापावच्या पेक्षा जास्त दिलं आहे का? स्वत: बिर्याणी आणि लाल मांस शिवाय खात नाही. कोणत्याही रेस्टाँरंटमध्ये गेल्यावर बिल न देता बाहेर येतात. त्यामुळे कार्यकर्त्यांना कोणत्या तोंड्यानं आयफोन वापरण्यास सांगत आहात.”

त्याचबरोबर तुमचं खरेच कार्यकर्त्यांवर प्रेम आहे, तर त्यांना आयफोन घेऊन द्या, असा टोला त्यांनी लगावला. अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना एवढी संपत्ती जमवून ठेवली आहे की, नंदकिशोर चतुर्वेदी भेटतच नाही. दुबई आणि साऊथ आफ्रिकेत हॉटेल असून, तो पैसा कोणत्या कामाचा आहे?, असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

अंबादास दानवे काय म्हणाले होते?

“आत्ताच्या घडीला ज्याप्रमाणे राजकारण सुरू आहे, त्यानुसार आपापली सुरक्षा घेण्याची गरज आहे. त्यामुळे पक्षातील प्रमुख लोकांनी आयफोन (I-Phone) वापरला पाहिजे अशा सूचना मी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांना दिल्या आहेत”, अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. सरकारचं जाणीपूर्वक सर्व हालचालींवर लक्ष असतं. आताचं सरकार कोणत्याही स्तराला जावू शकते. हे सरकार छोट्या-छोट्या शिवसैनिकांना त्रास देत आहे. त्यामुळे सरकारवर विश्वास नसल्याचं अंबादास दानवे म्हणालेत. सरकार गैरफायदा घेऊ शकतं म्हणून अशा सूचना आम्ही देत असतो, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :