Sambhaji Bhide | “शिवछत्रपतींना इंग्रजांच्या प्रसूतीगृहातून बाहेर काढा”; संभाजी भिडे पुन्हा बरळले!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sambhaji Bhide | पुणे : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येणारे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या आणखी एका वक्तव्यामुळे वाद पेटण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करू नका, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी जुन्नर येथे शिवप्रतिष्ठान च्या धारकऱ्यांच्या गटकोट मोहिमेच्या सांगता सभेत केलं आहे.

“अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shiv smarak) पुतळा उभारण्याचा आणि त्यांचा आयुष्याचा काही संबंध नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून हा स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करू नका. आमच्या छत्रपती शिवरायांना इंग्लंडच्या प्रसुतीगृहातून बाहेर काढा. त्यांची जयंती भारतीय हिंदू पंचांगानुसारच झाली पाहिजे, असं वक्तव्य संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी केलं आहे.

पुढे ते म्हणाले, “राज्यात सरकारं उलथी-पालथी होत आहेत. तो त्यांचा धंदा असला तरी दोन्हीही आपलेच आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन आपण पुढे जात राहिलं पाहिजे. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचं फक्त सोहळे करुन चालणार नाही. तर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे होकायंत्र समजून त्यांच्या विचारानुसार वागून, हिंदूस्थानची धारणा रक्तात भिनवण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न केले पाहिजे.”

मागील अनेक वर्षांपासून अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यासह शिवस्मारकाच्या प्रकल्पावर काम सुरु आहे. या प्रकल्पासाठी अद्यापही निविदा निघालेली नाही. मात्र या स्मारकाची गरज काय?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या :