Share

Jayant Patil | “सत्यजीत तांबेंचा विजय झाला तरी तो भाजपचा नसेल, कारण…”; जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

🕒 1 min read Jayant Patil | मुंबई : पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. सकाळी 8 वाजता मतमोजणीला होणार सुरुवात झाली आहे. यामध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघात काय होणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. काँग्रेसनं डॉ. सुधीर तांबेंना उमेदवारी दिली तर भाजपनं कुणालाचा अधिकृत उमेदवारी दिली नाही. जेव्हा अर्ज दाखल … Read more

Published On: 

🕒 1 min read

Jayant Patil | मुंबई : पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. सकाळी 8 वाजता मतमोजणीला होणार सुरुवात झाली आहे. यामध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघात काय होणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय.

काँग्रेसनं डॉ. सुधीर तांबेंना उमेदवारी दिली तर भाजपनं कुणालाचा अधिकृत उमेदवारी दिली नाही. जेव्हा अर्ज दाखल झाले तेव्हा नाशिकमधील रगंत आणखी वाढली. काँग्रसेचा एबी फॉर्म असतानाही सुधीर तांबेंनी अर्ज भरला नाही. तर त्यांचे पुत्र सत्यजीत तांबेंनी अपक्ष अर्ज भरला. तिकडे काँग्रेसनं तांबे पितापुत्रांचा निलंबनं केलं आणि भाजपच्या बंडखोर शुभांगी पाटलांनी मातोश्री गाठलं. पुढे त्यांना मविआनं अधिकृत उमेदवारी दिला आणि नाशिकची निवडणूक अधिक प्रतिष्ठेची बनली.

मात्र आता भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी सत्यजीत तांबेंनी भाजपामध्ये प्रवेश करण्याची अप्रत्यक्षपणे ऑफर दिली आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “नाशिकमध्ये सत्यजीत तांबे यांचा विजय झाला तरी, तो विजय भारतीय जनता पार्टीचा नसेल. कारण सत्यजीत तांबे हे अपक्ष उमेदवार आहेत”, असं सूचक विधान त्यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

[emoji_reactions]

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या