Chandrashekhar Bawankule | “सत्यजित तांबेंना जिंकायला कोणतीही अडचण येणार नाही” – चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule | मुंबई : राज्यात आज शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांच्या मतमोजणीची जोरदार चर्चा सुरू आहे. आज सकाळपासूनच या जिल्ह्यांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. नाशिक पदवीधर मतदासंघाच्या निवडणुकीकडे अवध्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. आज या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आणि आमदार सुधीर तांबे यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकासआघाडीने शुभांगी पाटील यांना आपला उमेदवार म्हणून घोषित केले आहे. सत्यजित तांबे विरूद्ध शुभांगी पाटील अशी ही लढत होतेय.

कोकणात भाजपानं विजयाचा नारळ फोडला असून ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले आहेत. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) जिंकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

“आजचा निकाल सरकारच्या बाजूने लागत आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे यांचाही विजय झालाय. त्यामुळे सत्यजित यांनाही जिंकायला कोणतीही अडचण येणार नाही”, असं बावनकुळे म्हणालेत. TV9 मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.